अकार चरण युगुल l उकार उदर विशाल l
मकर महामंडल l मस्तकाकारे ll
हे तिन्ही एकवटले
तेथे शब्दब्रह्म कवळले
ते मिया गुरुकृपे नमिले ll
संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे ओमकाराचे रूपक अत्यंत गोड अशा काव्यमय शब्दात ज्ञानेश्वरीत केले आहे. तो कर्ता आहे, करविता आहे, हर्ता- धर्ता तोच आहे.. तो ज्ञानमय आहे, विज्ञानमय आहे, सर्वांग परिपूर्ण आहे.
वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र अशी मूर्ती मनाच्या गाभाऱ्यात आपण अधिष्ठापिलेली आहे. शंभराहून अधिक वर्ष हे बाप्पाचं सुंदर रूप, मूर्तीकारांनी विविध रंग, आकार ,स्वरूपात पीओपी व शाडूच्या मातीतून आपल्यासमोर आणलं आहे. गेल्या शंभर वर्षांत गणेशोत्सवातील श्रींच्या मूर्तीची उंची, पीओपीपासूनची तिची रचना, विसर्जनाच्या मिरवणुका, चौपाट्यांवरील- तलावपरीसरातील प्रदूषण आणि विसर्जित मूर्त्यांची अशोभनीय अवस्था, यावर खूप चर्चा झाली.. गणपतीबाप्पाप्रती असलेल्या श्रद्धेवर टीका करण्याचा प्रश्न ‘तेव्हा’ नव्हता ‘आजही’ नाही. कार्यकर्त्यांचा व भक्तांचा आनंद, उत्साह यालाही विरोध नव्हता,आजही नाही.
परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे प्रश्न नियमांच्या चौकटीत बसवताना हे सारे तपासून पाहाण्याचा मुद्दा पुढे आला. माणसांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न कोरोनाने अधोरेखित केला आणि आता गणेशोत्सव साजरा करायचा कसा, हा मुद्दा चर्चेत आला. त्यातून उपाय पुढे आला “इको फ्रेंडली गणपतीचा”.. “इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा”. आज पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची साद घातली जात असताना, इको मोरया पेपर गणपतीला पर्याय नाही, हेच खरं. आपण पाहत असलेल्या श्रींच्या मूर्ती या इको मोरयाच्या आहेत. Eco-friendly आहेत, कागदापासून बनवलेल्या आहेत. पर्यावरण-प्रदूषणसंकटहारी म्हणून गणपती बाप्पाचा विचार केला तर पेपर मूर्तीचा स्वीकार आपण सर्वांनीच करायला हवा.
वजनाला खूप कमी,अशी ही पेपर- श्रीमूर्ती पीओपीच्या मूर्तीपेक्षा खूप सुंदर आहे,असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. विसर्जनासाठी घराजवळच्या कृत्रिम तलावात जायचे नसल्यास, घरच्या घरात टबात श्रींचे विसर्जन सहज सुलभ होऊ शकते. रस्त्यावर ध्वनी- वायु-प्रदूषण नाही, दुसऱ्या दिवशी तलावाकाठी, चौपाट्यांवर मूर्त्या वाईट अवस्थेत दिसण्याचा प्रश्नच नाही. प्रत्यक्ष गणपती बाप्पाच आपल्याला पेपर -गणपती साठी साद घालत आहेत. ही इको मोरया- ची टीम तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे.
Eco-Morya वर click करा… आणि घरपोच सेवेच्या माध्यमातून बाप्पाला घरी घेऊन या…
ll गणपती बाप्पा मोरया ll