``इको मोरया`` विषयी..

|| गणपती बाप्पा मोरया ||

‘इको मोरया’ चे कुशल हात सांघिकरित्या कागदाच्या लगद्यापासून  गणेशमूर्ती घडवण्यासाठी सज्ज आहेत. यातूनच आपल्यासाठी तयार आहेत “पेपर गणपती”.

टाकाऊ पदार्थांच्या उत्तम उपयोगातून आणि पर्यावरणपूरक साधनांतून सिध्द असा अंतिम परिणाम सर्वोत्तम असणार आहे… पर्यावरणाला बाधा न  आणणारा आणि किंमतीला नियंत्रित करणारा, असा हा प्रकल्प आहे. कागदाच्या लगद्यावर रंगांचा सुंदर आविष्कार, यातून अतिशय सुबक आणि सुंदर मूर्ती आकाराला आल्या आहेत. छपाई उद्योगातील टाकाऊ कागदांवर प्रक्रिया करून अतिशय आखीवरेखीव घडवलेले  गणपती बाप्पा घरोघरी जाण्यासाठी सज्ज आहेत. “इको मोरया” संकल्पनेत बहुआयामी घटकांचा विचार समाविष्ट आहे; त्यातील एक महत्वाचा  म्हणजे, या मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन करण्याची, सोपी सुटसुटीत सुविधा! त्यातूनच घरच्या मंडळींच्या मनातील गणेश- विसर्जनाबरोबर येणारा भावनिक विचार, एक चिरंतन स्मृती म्हणून, नक्कीच आनंददायी असेल..